Uttar Pradesh – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी लखनौ येथील लोक भवनात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 21 पैकी 20 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत “पंतप्रधान घरकुल’ योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीत मोफत गॅस सिलिंडर (Free cylinder) देण्यास मान्यता देण्यात आली. याअंतर्गत 1 कोटी 75 लाख 4 हजार 385 लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर (Free cylinder) दिले जाणार आहेत.
बैठकीत सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून देण्याच्या आणि मोठ्या कंपन्यांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
अर्थमंत्री सुरेश खन्ना म्हणाले की, सॅमसंग इंडियाला मेगा प्रोजेक्टच्या 15 वर्षांमध्ये प्रोत्साहन म्हणून 1751 कोटी रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे एलजी इंडियाची 567 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांना नियमानुसार प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाईल.
एफडीआयच्या माध्यमातून राज्यात 9400 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे खन्ना यांनी सांगितले. राज्यात एफडीआय धोरणांतर्गत जमीन खरेदी करून 100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीवर मुद्रांक शुल्कात सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.