मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात सतत वाढ होताना दिसून येत आहे. या भाववाढीचा परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. टॅक्सी सर्व्हिस उबरकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. उबरने मुंबईतील भाडे 15 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. अशी माहिती उबर इंडिया अँड साऊथ एशियाचे वरिष्ठ अधिकारी नितीन भूषण यांनी दिली आहे.
नितीन भूषण भाडेवाढ करण्याचे कारण सांगताना म्हणाले की, उबर मुंबईतील प्रवासाचे भाडे 15 टक्क्यांनी वाढवत आहे. आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार अनेक चालक करत आहेत. इंधन दरवाढीचा फटका चालकांना बसण्यासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे.भविष्यातील इंधनाच्या किमतीत होणार्या वाढीवर ते लक्ष ठेवतील आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलतील.