मुंबई – हृदयविकाराचा झटका आल्याने आर्यन खान ड्रग प्रकरणातील मुख्य साक्षिदाराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रभाकर साईल असे या साक्षादीराचे नाव आहे. चेंबूर येथे साहिल यांचे निधन झाले असून त्यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजता त्यांच्या अंधेरी येथील घरी आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोण आहे प्रभाकर साईल?
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. या किरण गोसावीचा खासगी अंगरक्षक प्रभाकर साईल होता. एवढेच नाही तर प्रभाकर साईल एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले होते. 25 करोड रुपये लाच मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर केला होता.