बीड – वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या भरारी पथकाच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर तहसीलदार गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पहाटे चार वाजता घडली.
ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर असणाऱ्या, सावळेश्वर फाट्यावर घडली. नितीन जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार असणारे सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत. हा अपघात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.