पिंपरी – खिडकीत उभा राहून तरुणाने समोरच्या घरातील महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री पावणेआठच्या सुमारास संतनगर मोशी येथे घडली.
तुषार शिवाजी पांचाळ (वय 28, रा. संतनगर मोशी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. 5) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरासमोर आरोपी राहत होता. त्याने शुक्रवारी रात्री फिर्यादी त्यांच्या किचनमध्ये काम करत होत्या. त्यावेळी आरोपी त्याच्या खोलीच्या खिडकीत येऊन अंगावर कपडे नसताना अश्लील हावभाव करत असल्याचे फिर्यादीला दिसले.
फिर्यादीने त्यांच्या इमारतीमधील दोघांना बोलावून हा प्रकार दाखवला असता आरोपीने त्यांच्याकडे बघूनही अश्लील हावभाव केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
….