पिंपरी – भोसरी येथे एका व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी (दि. 2) दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश रघुनाथ भिलारे (वय 32) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार लाला हेमाडे यांनी गुरुवारी (दि. 3) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरातील श्रीकृष्णा पुरम जे ब्लॉक येथे एका बोलेरो पिकअपमध्ये अज्ञातांनी राकेश भिलारे यांचा गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत घडली.