मुंबई – 44 वर्षीय कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर याच्यावर नुकतीच हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. सुनीलची प्रकृती आता स्थिर आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सुनीलला आज मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अभिनेत्याला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होती. त्यानंतर 27 जानेवारीला त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. सध्या सुनीलच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे.
सूत्रांती दिलेल्या माहितीनुसार सुनीलच्या हृदयात ब्लॉकेज आढळले होते. अभिनेत्यावर वेळेवर शस्त्रक्रिया न केल्यास त्याला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता. अशा परिस्थितीत कॉमेडियनने लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ‘आताच सुनील ग्रोव्हरच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर आता त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल. असे ट्वीट आज एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.
सुनीलच्या छातीत दुखू लागल्याने त्याला मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या अनेक तपासण्या केल्या. त्यानंतर त्याच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचं समोर आले. त्यानंतर अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुनीलच्या हृदय शस्त्रक्रियेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना ही बातमी ऐकून धक्का बसला. मात्र आता त्याच्या प्रकृती स्थिर आहे.