पुणे -सलग तीन दिवसांपासून करोना बाधितांची संख्या तीन हजारांच्या आत नोंदवली जात आहे. ही “पॉझिटिव्ह’ गोष्ट असून, येथून पुढे बाधितांची संख्या उतरणीला लागेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
बुधवारी नव्या 2 हजार 846 बाधितांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांतील सात जण पुणे शहरातील आहेत. यांचा समावेश करून आजपर्यंत 9 हजार 261 जणांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 6 लाख 44 हजार 341 जण बाधित सापडले असून, 6 लाख 11 हजार 50 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 5 हजार 521 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सक्रीय बाधितांची संख्याही कमी झाली असून, 24 हजार 030 एवढे सक्रीय बाधित सध्या आहेत. त्यातील 48 जण व्हेंटिलेटरवर असून 28 जण इव्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय 301 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 4.46 टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.