मुंबई – सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ने हिंदी मार्केटमध्ये जवळपास 80 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘पुष्पा’ सध्या ओटीटीवर रिलीज झाला आहे पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे. हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. सध्या चित्रपटातील पुष्पा या पात्राच्या काही खास शैली सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत.
यामध्ये खांदा वाकून चालणे, पाय घसरत घसरत केलेला डान्स, दाढीवरुन हात फिरवत केलेली डायॉगबाजी, बिडी पकडण्याची स्टाइल, गॉगल उतरवण्याची स्टाइल अशा अनेक गोष्टी तरुणाईला चांगल्याच भावल्या आहेत. या साऊथ सिनेमाला हिंदीत जोरदार प्रतिसाद मिळाला असून, आता संपूर्ण देश पुष्पाच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच ‘पुष्पा द रुल पार्ट 2’ आगमनाची वाट पाहत आहे.
अलीकडेच मनीष शाहने एका मुलाखतीत ‘पुष्पा 2’ च्या रिलीज डेटपासून ते शूटिंग शेड्यूलबाबत माहिती दिली. मुलाखतीत मनीष शाह म्हणाले की, ‘पुष्पा 2- द रुल’चे शूटिंग यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. लवकरच या सिनेमाचे काम पूर्ण केल्यानंतर
निर्माते हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतील. मात्र, या वरून असे दिसून येते कि ‘पुष्पा 2’ यावर्षी प्रदर्शित होणार नसून सिनेमाच्या शूटिंगला दीर्घ वेळ लागणार आहे. त्यामुळे आता पुष्पाच्या फॅन्सला आणखी थोडा वेळ तरी सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे.