चंद्रपूर- विदर्भातून दररोज मोठ्या अपघाताच्या घटना समोर येताना दिसून येत आहे. असे असताना आज विदर्भातील चंद्रपूरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक्टर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात ब्रम्हपुरी तालुक्यात येणाऱ्या रंगमोचन फाट्यावर दहा वाजताचा दरम्यान घडला. अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये ट्रक्टरचे दोन तुकडे झाले.
आनंद गण्यारपवार असे अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून गडचीरोली जिल्ह्यातील चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अतुल यांना तातडीने ब्रम्हपूरी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सभापती अतुल गण्यारपवार आणि त्यांचे भाऊ आनंद गण्यारपवार हे गडचीरोलीवरून नागपूरला निघाले होते. दरम्यान, ब्रम्हपूरी तालुक्यातील रंगमोचन फाट्याजवळ ट्रक्टर आणि कारची जोरदार धडक झाली. या धडकेत ट्रक्टरची ट्राली आणि मुंडके वेगळे झाले. या अपघातात आनंद गण्यारपवार यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला तर सभापती अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले.