मुंबई – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता ‘सलमान खान’ त्याच्या फॅन्ससाठी सतत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. असंच काहीसं आजही सलमान एक खास गिफ्ट त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आला आहे. सलमानच नवीन गाणं आज (दि. २२) प्रेक्षकांच्या भेटीला असून, गाणं रिलीज झाल्याची माहिती स्वतः सलमानने आपल्या ट्विटर आकाउंटवरून दिली आहे.
“मैं चला..’ असं या नवीन गाण्याचं नाव असून सलमानचं हे गाणं त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतंय. या गाण्याला एका तासात तब्बल १ मिलियनहून जास्त व्हूज मिळाले आहेत. “मैं चला..’ गाण्यात सलमान सोबत प्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जायसवाल स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.
Tune in to listen #MainChala. Song is out now: https://t.co/iKi9ltxrmo#tseries @TSeries @SKFilmsOfficial @ItsMePragya @GuruOfficial @IuliaVantur @Musicshabbir @shabinaakhan @directorgifty @adityadevmusic
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 22, 2022
तर हे गाणं पंजाबी गायक ‘गुरू रंधावा’ आणि सलमानची जवळची मैत्रिण ‘यूलिया वंतूर’ने गायलं आहे. गाण्यात सलमान खान पंजाबी लूक मध्ये दिसत आहे. पगडी घातलेली पहायला मिळतेय. त्यामुळे त्याचा नवा लूक आणि त्याचं गाणं प्रेक्षकांना चांगलं भावलं आहे.