उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागात मथुरा-पलवल मार्गावर मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले. त्यामुळे आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडी रुळावरून घसरल्याने या मार्गावरील 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जेसीबीच्या मदतीने मालगाडीचे डबे हटवण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सिमेंटने भरलेली मालगाडी मथुराहून गाझियाबादकडे जात होती. त्यानंतर अचानक मालगाडीचे 15 डबे छटिकाराजवळ रुळावरून घसरले. यामुळे ट्रॅक पूर्णपणे खराब झाला आहे. या अपघातामुळे गाड्यांचे मार्ग विस्कळीत झाले. मुंबईहून येणाऱ्या राजधानी शताब्दी साप्ताहिक ट्रेन युवा स्पेशलसह महत्त्वाच्या गाड्या दिल्लीला जाण्यासाठी वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.