जमैका – आयर्लंड संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी वेस्ट इंडिज संघाचा 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव केला व मालिका जिंकली.
त्यांनी यजमान वेस्ट इंडिजचा तिसऱ्या सामन्यात 2 गडी राखून पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली.
आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशा विरुद्ध परदेशात विजय मिळवण्याची आयर्लंड संघाची ही पहिलीच वेळ आहे. तर पूर्ण वेळ सदस्य असलेल्या देशाविरुद्ध मिळवलेला हा त्यांचा दुसरा विजय आहे.
2019 साली त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकली होती. या मालिकेत आयरर्लंडने पहिली लढत गमावली होती. त्यानंतर दोन लढतीत विजय मिळवून विजय साकारला.