मुंबई – ईडीने रासपचे माजी आमदार रत्नाकर गुट्टे यांची डिसेंबर 2020मध्ये 255 कोटींची संपत्ती ताब्यात घेतली होती. त्यात आता 635 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ईडी कडक पाऊल टाकत आहे. गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रातच ईडीने धडक कारवाया करत तब्बल 2167 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
ईडीने केलेल्या कारवाईत प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या संपत्तीचा यात समावेश आहे. तसेच पीएमसी बॅंक घोटाळा, एचडीआयएल, डीएचएफएल अशी काही कॉर्पोरेट उद्योगातील नावेही यात आहेत.
ईडीप्रमाणेच काही प्रकरणांमध्ये आयकर खात्यानेही स्वतंत्र कारवाया करुन संपत्ती जप्त केली आहे. नोव्हेंबर 2021मध्ये आयकर खात्याने पुणे, मुंबई, दिल्ली गोवा येथे छापे टाकत सुमारे 1400 कोटी रुपयांची संपत्ती केली होती.