मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईत भरदिवसा बँक लुटण्याच्या घटनेने पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. मुंबईत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर शाखेत दोन मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकला. गोळीबार करत असताना चोरट्यांनी शाखेत घुसून एका कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आणि अडीच लाखांचा ऐवज लुटून तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
Mumbai | One SBI contract employee died after being shot by 2 unknown persons at bank's Dahisar branch. One of them opened fire at the employee. They collected about Rs 2.5 lakhs from cashier, & fled; 8 teams placed for search: Pravind Padwal, Additional CP, North Region (29.12) pic.twitter.com/83jBYJjNPB
— ANI (@ANI) December 29, 2021
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एसबीआयच्या दहिसर शाखेत बुधवारी संध्याकाळी मुखवटा घातलेल्या दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार करत बँकेत प्रवेश केला. बॅंकेत उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. यावेळी बॅंकेत एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान मुखवटा घातलेले हल्लेखोर थेट कॅश काउंटरवर पोहोचले आणि हवेत गोळीबार करत रोख रकमेची मागणी केली.
सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओमध्ये महिला कर्मचारी बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरोडेखोर हातात बंदूक घेऊन, रोख देण्यास सांगतो तेव्हा महिला कर्मचारी स्तब्ध झाल्या. यादरम्यान एका आउटसोर्स कर्मचाऱ्यावर एका दरोडेखोराने गोळीबार केला. या गोळीबारात त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून महिला कर्मचारी घाबरल्या त्याचवेळी चोरटे रोख घेऊन पळून गेले.