अहमदनगर – भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना करोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना भाजपच्या आणखी एका नेत्याला करोनाची लागण झाली आहे. भाजप नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. याशिवाय संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे विलीगीकरणात गेले आहे.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असे ट्वीट पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे. याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती यांना करोनाची लागण झाली आहे. आज आमदार माधुरी मिसाळ यांचा सुद्धा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.