अलीकडेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला साप चावला होता. या बातमीने सलमानचे चाहते चांगलेच चिंतेत पडले होते. सुदैवाने सलमानला चावणारा साप विषारी नव्हता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 6 तासांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेता आता पूर्णपणे बरा आहे. बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. वास्तविक, इंटरनॅशनल सिंगर मेटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
https://twitter.com/Maetasworld/status/1472658508038373377
अलीकडेच या गायिकेने तिच्या एका फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा भयानक व्हिडिओ शेअर करत सिंगरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘पुन्हा कधीच नाही’. मेटाने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे.समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सिंगर फोटोशूट करताना दिसत आहे. शूटसाठी ती सापासोबत पोज देताना दिसत आहे. दरम्यान, अचानक काळ्या रंगाचा साप तिच्या हनुवटीवर चावतो. साप चावल्याने मेटा भयंकर घाबरली आणि लगेच त्याला उचलून फेकून दिले.
View this post on Instagram