शिक्रापूर – दरेकरवाडी (ता. शिरूर) येथील काही युवकांनी चार वर्षांपूर्वी सुरु केलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ते रायगड छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा सुरू केला आहे.
सलग चौथ्या वर्षी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. यामध्ये काही महिलांनी देखील सहभाग घेऊन समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दरेकरवाडी येथील माजी उपसरपंच हिरामण दरेकर यांनी काही युवकांना एकत्रित करत चार वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक तसेच आळंदी ते रायगड छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी
सोहळा आयोजित केला होता. दरम्यान पायी पालखी सोहळ्याला युवकांचा दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असता यावर्षी देखील पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये ओम महाराज अटकळ, माजी उपसरपंच हिरामण दरेकर, चंद्रकांत दरेकर, संजय जगताप, निखील दरेकर, रामदास दरेकर, शिवाजी दरेकर, संतोष देशमुख, संपत नरके, ऋषिकेश दरेकर, बबलू दरेकर, कुंडलिक दरेकर, माऊली गव्हाळे, मालन गिते,
हौसाबाई दरेकर, सुनीता दरेकर, विजया दरेकर, इंदुबाई दरेकर आदींनी विशेष सहभाग घेतला आहे. श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथून 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत पालखीचे प्रस्थान ठेवले.