नाशिक – राज्यात आत्महत्येच्या रोज नवीन घटना समोर येताना दिसून येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक येथून समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या आश्रमशाळेमधील एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेमध्ये घडली आहे.
रोहिणी वड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीने नाव असून ती बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत होती. रोहिणीने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही.