अमरावती – महिंद्रा बोलेरो व कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचा पती व एक मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. या कारमध्ये 1 वर्षाचे बाळ सुद्धा होते सुदैवाने हे बाळ थोडक्यात बचावले आहे. मात्र या चिमुरड्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील म्हैसपूर फाटा तालुका दर्यापूर येथे घडला आहे. जखमी पतीस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
भारती गजभिये, वय 40 असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव असून प्रेम हरिदास गजभिये, वय 45 जखमी पतीचे नाव आहे तर वंशिका विलास मानकर, वय 17 असे जखमी मुलीचे नाव आहे. वंशिका या दाम्पंत्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी यांच्याकडे होती.