Big Boss Marathi फॅमिली वीक; घरामध्ये सदस्य होणार फ्रीज…

मुंबई   : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य आता जवळपास ९ आठवडे राहिले आहेत आणि आता सुरू झाला आहे १० वा आठवडा… आपल्या परिवारापसून दूर, कोणताही संपर्क न साधता बिग बॉसच्या घरामध्ये तब्बल ६५ दिवसाहून अधिक दिवस रहाणं काही सोपं नाहीये. आणि म्हणूनच हा आठवडा सदस्यांसाठी त्यांच्या या प्रवासावातील अविस्मरणीय आठवडा ठरणार आहे.

कारण सुरू होतो आहे फॅमिली वीक… सदस्यांना भेटायला येणार आहेत त्यांच्या परिवारातील सदस्य. या दिवसाची वाट सदस्य खूप दिवसांपासून बघत असतात. घरातील सदस्य भेटून गेल्यावर पुन्हा जोमाने खेळण्याची उभारी, नवी ऊर्जा मिळते असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शब्द त्यांना हिंमत देऊन जातात.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना बिग बॉस फ्रीज होण्याचा आदेश देत आहेत. तुम्हांला तर कळालंच असेल आता काय होणार आहे. सदस्यांची अखेर त्यांच्या कुटुंबियांशी भेट होणार आहे. विकासला भेटायला त्याची बायको घरामध्ये जाणार आहे. गायत्री, विशाल यांना अश्रु अनावर झाले. विकासने त्याच्या मुलाची चौकशी केली. अजून काय काय गप्पा मारल्या, कोणत्या गोष्टी शेअर केल्या, बायकोने त्याला काय संदेश दिला बघूया आजच्या भागामध्ये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.