व्हॉट्सऍपचे जगभरात २ अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. इन्स्टंट मेसेजिंग सेवा देणारे हे ऍप जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये वापरले जाते. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सऍप हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
यामुळे आपले कुटुंब आणि प्रियजन आपल्याजवळ आले आहेत. आज लोक त्यांचे फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे इत्यादी मोठ्या प्रमाणावर एकमेकांना शेअर करत आहेत. व्हॉट्सऍपवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. आज आपण त्या कोड क्रमांकाबद्दल बोलणार आहोत जे डॉक्युमेंट किंवा फाईल पाठवताना त्यांच्या खाली येत असतात.
हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्या मदतीने बरेच काही कळू शकते. या कोड क्रमांकांमध्ये फाइलशी संबंधित अनेक माहिती दडलेली आहे. या नंबरद्वारे तुम्ही दस्तऐवज किंवा फाइलबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता.
वास्तविक हे कोड नंबर एक प्रकारे फाईलचे नाव आहेत. अनेक वेळा आपण कोणताही फोटो, फाईल किंवा डॉक्युमेंट कोणत्याही नावाने सेव्ह करत नाही, अशा परिस्थितीत हे नंबर त्या फाईलच्या तळाशी दिसतात.
उदाहरणार्थ, हे क्रमांक YYYYMMDD_HHMMSS या स्वरूपात लिहिलेले असतात. तुमच्या कोणत्याही फाइल किंवा दस्तऐवजाखाली 20210807_112109 लिहिलेले असेल, तर याचा अर्थ फाइल 7 ऑगस्ट 2021 ची आहे. ज्या फाइल्सना नाव नाही, त्यांचे नाव या फॉरमॅटमध्ये सिस्टमद्वारे एंटर केले जाते.