वाघोली (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या आधुनिकीकरणाच्या उंबरठ्यावर गोर गरीब तसेच दगड खाण कामगारांच्या मुलांसाठी डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देणारी रेगे कुटुंबांनी उभारलेली वाघोलीतील पहिली शाळा असून या शाळेतून मोफत शिक्षणाचा आदर्श उभा केल्याबद्दल रेगे कुटुंबांचे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी कौतुक केले.
बाल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार अशोक पवार बोलत होते. दगडखाण क्षेत्रातील शिक्षण वंचित बालकांसाठी गेली चोवीस वर्ष चालू असलेल्या संतुलन पाषाण शाळेतील बालकांसाठी बालदिना निमित्त वाघोली येथे आयोजित केलेल्या गंमत जंमत बाल आनंद मेळाव्यात बालकलाकार श्रीश खेडेकर, अश्विन तांबे व कथक नृत्यांगना गाथा संतोष राउत, यांनी विविध कला गुण दर्शन सादर करून दगडखाण क्षेत्रातील मुलांना बाल दिनाची भेट दिली.
आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते भूतपूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बालकलाकारांच्या हस्ते व लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब सातव पाटील, राष्ट्रप्रेमी युवा मंचचे संस्थापक भोलाशेठ वांजळे, संतुलन संस्थेच्या संचालिका अॅड. पल्लवी रेगे, संतुलन अध्यक्ष वंदना भुजबळ, सुनिता सराटे, राष्ट्रवादीचे प्रदीप भाऊ कंद यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून बाल आनंद मेळाव्याची सुरुवात झाली.
वाघोली आणि पंचक्रोशी मधील गोरगरिबांच्या मुलांसाठी डिजिटल क्लासरूम उभारून मोफत शिक्षणाचा मूलमंत्र देणाऱ्या रेगे कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श उभा केला आहे. आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा गोर गरीब मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे.
– बाळासाहेब सातव पाटील(उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
राज्याच्या दगडखाण क्षेत्रातील बालकांसाठी संतुलन पाषाण शाळा करत असलेल्या कार्यामुळे बालमजुरी, बालविवाह, शोषण नष्ट होत असल्याने शेवटच्या मुलाला शिक्षनाचा हक्क देण्यास संस्था कटिबद्ध असल्याचे मत Adv.बी.एम.रेगे यांनी कार्यक्रमाची प्रास्तविकतेत मांडले. कार्यक्रमाला वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, सुयोगनगर वस्तीतून शेकडो विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे व संयोजन अनिल राजगुरू, निखील गायकवाड,पांडुरंग भालेराव, संध्या पाटोळे, प्रिया डाडरव अश्विनी पात्रे, स्नेहप्रभा वैराळ, दीपक जॉन, सुनील मसिह,सीमा साळवे,पार्वती विभूते,स्टेफी मरीअम, रोशन जॉन, पॉल व रेणू मसिह यांनी केले.