वाघोली – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात वाघोली आणि लोहगाव परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेउन रक्तदान करून महापौरांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
हवेली तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव पाटील व वाघोली शहर भाजप अध्यक्ष केतन जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी करोना काळात सामाजिक जाणीव ठेवून पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी अविरतपणे सेवा देणाऱ्या पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून अनोख्या शुभेच्छा दिल्या.
“करोना काळात सामाजिक जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकांसाठी प्रयत्न करणाऱ्या पुण्यनगरी च्या महापौरांच्या कार्याची प्रचिती सर्वश्रुत आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.”
– अनिल सातव पाटील (अध्यक्ष, हवेली तालुका युवा मोर्चा)