लातूर – लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या अवैद्य ठरवलेल्या उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैद्य ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे लातूरमधील कॉंग्रेससह महाविकास आघाडीचे ठोके वाढले आहेत. सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकाकडे झालेल्या सुनावणीत हे अर्ज वैद्य ठरविण्यात आले आहेत.
21 नोव्हेंबर रोजी लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. सुरुवातीला भाजपच्या उमेदवारांचे अर्ज अवैद्य ठरवण्यात आले होते. तेव्हा ही निवडणूक एकतर्फी होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज अवैद्य ठरवल्यानंतर यासंदर्भात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे अपील केली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांचे अर्ज वैद्य केले आहेत.
या निवडणूकीत भाजपच्या 35 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 19 जागांसाठी हे अर्ज केले गेले होते. मात्र 10 ऑकटोबर रोजी भाजपच्या या उमेदवारांचे अर्ज अवैद्य ठरवण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे या निर्णयावर आपेक्ष घेत याप्रकरणी दाद मागितली असून यामध्ये त्यांना यश आले आहे.