वाघोली – कोलवडी तालुका हवेली येथील शिवशक्ती विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मच्छिंद्र किसन मदने यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडीबद्दल शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते मदने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी चेअरमन किसन गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आशोक गायकवाड, माजी सरपंच मारुती मदने, माजी चेअरमन जयसिंग गायकवाड,माजी उपसरपंच शंकर मदने, ग्रा.पं. सदस्य शशिकांत गायकवाड, स्कुल कमिटी अध्यक्ष दिलीप गायकवाड ,मानसिंग गायकवाड, उद्योजक रमेश मदने, अमर गायकवाड, सचिन गायकवाड, रविंद्र गायकवाड ,अभिजीत मदने, संतोष मदने,मयुर मदने, सौरभ मदने, स्वप्निल नितनवरे, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.माळवदकर यांनी कामकाज पाहिले आदी उपस्थित होते