मंबई- अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखती दरम्यान आपल्या आई- वडीलांबाबत एक खुलासा केला आहे. साराला तिच्या लहानपणी वाटयचे तिचे वडील सैफ अली खान फक्त शिवीगाळ करतात तर आई अमृता एक पॉर्न साईट चालवते. अभिनेत्रीला वाटायचे की तिचे आई-वडील हे वाईट लोकं आहेत. साराने हेही सांगितले की ती तिच्या आई-वडीलांबाबत असा विचार का करत होती.
लहानपणी साराने तिच्या वडीलांचा ओमकारा हा चित्रपट बघीतला होता. 2006 मध्ये आलेल्या या चित्रपटात सैफ अली खानने लंगडा त्यागी नावाच्या खलनायकाची भूमीका साकारली होती. या चित्रपटात सैफ अली खान व्यतिरीक्त अजय देवगन, करीना कपूर खान, कोंकणा सेन शर्मा आणि विवेक ओबेराय होते. तेच त्याआधी अमृता सिंह, कुणाल खेमुचा 2005 मध्ये कलयुग हा थ्रिलर चित्रपट आला होता.
एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने हे दोन चित्रपट बघून याच्या तिच्यावर काय परिणाम झाला. साराने सांगितले की, लहानपणी मी ओमकारा व कलयुग हे दोन चित्रपट बघीतल्यावर मला वाटायचे की, माझे आई-वडील किती वाईट आहेत. यावेळी अभिनत्री सांगितले की, मला वाटायचं, माझे वडील शिवीगाळ करतात तर आई पॉर्न साइट चालवते. पुढे साराने सांगितले की, एकाच वर्षात त्या दोघांना नकारात्मक भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे नामांकन मिळालं होतं.