नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पुन्हा एकदा ट्विटरवरुन खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना त्यांनी थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
“चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय.
Jaideep Rana https://t.co/3GccIpONI2
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
अन्य एका ट्विटमध्ये या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असे असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. फोटोमध्ये अमृता यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती जयदीप राणा असून या व्यक्तीला जून २०२१ मध्ये एनसीबीने अटक केल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती सध्या तुरुंगामध्ये असल्याचा दावा केला जात आहे. तसेच त्यांनी आणखी एक ट्विट केले असून त्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा एकत्र दिसत आहेत.
Photograph of Jaideep Rana with Ex Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/Sxo1diTalX
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
नवाब मलिक यांनी या ट्विटनंतर आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हटले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मलिक आणखीन काही खुलासा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मलिक यांनी यापूर्वीही भाजपाच्या काही नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप केले होते. मात्र यावेळेस त्यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा फोटो शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.