नवी दिल्ली – आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची पुन्हा युती होऊ शकते का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर अद्याप मिळालं नसल तरी सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला असून यामध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी समोरासमोर दिसत आहेत.
दिल्ली ते लखनौ प्रवासादरम्यान प्रियंका आणि अखिलेश एकाच विमानात प्रवास करत होते. यावेळी ते एकमेकांच्या समोर आले. अखिलेश यादव सपाचे संरक्षण मुलायम सिंह यादव यांना भेटण्यासाठी दिल्लीला आले होते. भेटीनंतर ते लखनौला परतले. याच विमानात प्रियंका गांधी प्रवास करत होत्या. या भेटीच्या फोटोनंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि सपा सोबत येईल, या चर्चांना उधाण आलं आहे.
बाराबंकी येथील प्रतिज्ञा रॅलीला प्रियंका गांधी हिरवा झेंडा दाखवणार आहे. या व्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांमध्ये प्रियंका भाग घेणार आहेत. मागील काही दिवसांपासून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. मागील ३२ वर्षांपासून उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून बाहेर राहिलेल्या काँग्रेसला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी प्रियंका गांधी प्रयत्न करत आहेत.