ओडेन्स – भारताची स्टार बॅडमिंटनपटू व दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफामनवर विजय मिळवला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सिंधूने बुसाननचा 67 मिनिटांत 21-16, 12-21, 21-15 असा पराभव केला.
जपानच्या टोकियोत ऑगस्ट महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉंझपदक विजेत्या सिंधूची ही ऑलिम्पिकनंतरची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
यापूर्वीच्या सामन्यात सिंधूने तुर्कस्तानच्या नेस्लिहान यिगिटचा 21-12, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव केला होता व उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती.