National hockey competitions | महाराष्ट्राचे गुजरातविरुद्ध तब्बल 23 गोल

सिमडेगा (झारखंड) – कुमार गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या मुलींनी गुजरातचा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने गुजरातवर तब्बल 23 गोल केले. या सामन्यात महाराष्ट्राचा बचाव इतका भक्कम होता की, गुजरातला एकही गोल करता आला नाही.

इ गटात झालेल्या या लढतीत पहिल्या मिनिटापासूनच महाराष्ट्राच्या मुलींनी गोल केला. महाराष्ट्राच्या अश्‍विनी कोळेकरने 4, 14, 42 आणि 53 व्या मिनिटाला गोल केले. शिवानी साहुने 10, 11, 35, 36 व 41 व्या मिनिटाला गोल केले.

काजल आतपाडकरने 17, 21, 22, 28 व 54 व्या मिनिटाला गोल केले. उत्कर्षा काळेने 8, 23, 29 व 51 व्या मिनिटाला गोल केले, तर हिमांशी गवांडे व मनश्री शेडगेने प्रत्येकी दोन गोल केले.

या स्पर्धेतील अन्य सामन्यांत ओडीशाने हिमाचल प्रदेशचा 12-0 असा पराभव केला. छत्तीसगडने मध्य प्रदेशचा 4-1 असा पराभव केला. चंदीगडने गोवा संघावर 10-1 अशी मात केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.