नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणातील बाधित कुटुंबांना भेटण्यासाठी चाललेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सध्या विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात रोज नवनव्या घटना समोर येत आहेत. प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेऊन ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे, त्या खोलीबाहेर ड्रोन फिरत असताना दिसत आहे. असा व्हिडिओ छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शेअर केला आहे.
30 घंटे से अधिक से हिरासत में रखी गई प्रियंका गांधी जी के कमरे के ऊपर ये ड्रोन किसका है और क्यों है?
जवाब कौन देगा? pic.twitter.com/pyWDtXgjIe
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) October 5, 2021
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले आहे की, ३० तासांहून अधिक काळापासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर हा कोणाचा ड्रोन आहे आणि तो का आहे? उत्तर कोण देईल?
बघेल यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक ड्रोन उडताना दिसत आहे आणि त्याच्यासमोर एक खोली आहे. या खोलीत प्रियंका गांधींना ठेवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. प्रियंका गांधी काल लखीमपूर खेरी याठिकाणी जात होत्या. मात्र त्यांनी सकाळीच सीतापूर इथून ताब्यात घेण्यात आले.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आज लखनौला गेले आहेत. ते सीतापूरमध्ये प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी जाण्याचीही शक्यता आहे, तसंच ते पुढे लखीमपूर खेरी इथंही जातील. मात्र, त्यांना तिकडे जाऊ देतील की नाही, याबद्दल साशंकता आहे.