चिंबळी – विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या जुन्या इमारतींची दुरुस्ती करुन नविन इमारती मध्ये शौचालय बांधणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया माजी उपसरपंच व माजी चेअरमन आशिष मु-हे यांनी दिली. खेड तालुक्यातील कुरूळी येथील अग्रेसर असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सभेत माजी उपसरपंच व माजी चेअरमन व विद्यमान संचालक आशिष मु-हे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष संजीवनी सोनवणे, संचालक काळूराम कड, बाजीराव बंधारे, सुरेश गायकवाड, संभाजी सोनवणे, अनिल बागडे, ज्ञानेश्वर गोसावी, कमल तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे, तज्ञ संचालक शांताराम घाडगे, दत्तात्रय सोनवणे, माजी सरपंच देवराम सोनवणे, सरपंच शिल्पा सोनवणे, उपसंरपच विशाल सोनवणे, सागर मु-हे, नितिन गायकवाड, चंदन मु-हे आदि मान्यवरांसह सर्व सभासद उपस्थित होते.
यावेळी सचिव चंदन पानसरे यांनी मागील विशेष सभेचे प्रोसिडींग वाचून दाखविले व ३१/३/२०२१ अखेरचा हिसोब वाचून ताळेबंद नफा तोटा वाचुन कायम करणे, लेखापरिषण विचार करून दोष दुरुस्ती अहवाल पाठविणे, सन २०२१/२२ अंदाज पत्रकास मंजुरी देणे, पुणे जिल्हा म.स.बॅकेकडून सन २०२१/२२ भावासाठी कर्ज उभारणी विचार करणे व संचालक मंडळास नविन कामे करण्याचा अधिकार देणे, कर्जाबाबत विचार करणे, लेखा परीक्षकाची नेमणूक करणे ,अंदाज पत्रकापेक्षा जादा खर्चास मान्यता देणे आदि विषयांवर चर्चा केली.
तसेच नुकत्याच झालेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा व सचिव चंदन पानसरे व कुरुळी चिबळी परिसरात करोना महामारीच्या काळात निर्भयपणे काम करणाऱ्या पत्रकार सुनिल बटवाल यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.