चिंबळी – चिंबळी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या सर्व साधारण पुरूष वर्गासाठी सहा अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत बारवे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी. बी. पाटील यांनी सांगितले.
चिंबळी ग्रामपंचायतीची वर्षापूर्वी निवडणूक झाली होती.
वॉर्ड क्र 4 मध्ये सर्व साधारण पुरूष म्हणून विजय महादेव जगनाडे हे निवडून आले; परंतु त्यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली आहे. दरम्यान, सहा अर्ज दाखल झाले असून मंगळवारी (दि. 7) अर्जाची छाननी करण्यात आली आली. यामध्ये सहाही अर्ज वैध ठरले आहे. दरम्यान, अर्ज माघारीची मुदत गुरुवार (दि. 9) पर्यंत असल्याने एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात चुरस होण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखल उमेदवार
अनुराग जैद, समीर जैद, ज्ञानेश्वर कड, दिलीप पाठारे, पंडित कड, अभिजित जगनाडे.
त्या पक्षाचा सरपंच, उपसरपंच?
या जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून गुरुवारपर्यंत किती उमेदवार अर्ज माघार घेणार व कोण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, ही निवडणूक अटीतटीची लढत होणार असून या निवडणुकीवरून त्या पक्षाचा सरपंच, उपसरपंच होणार असल्याची चर्चा गावत रंगली आहे.