चिंबळी – कुरूळी (ता. खेड) येथील डोंगरे वस्तीत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत ड्रेनेज लाइनच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आल्याचे, ग्रामविकास अधिकारी कविता कोलवाल यांनी सांगितले.
नवनिर्वाचित सरपंच कविता गायकवाड यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद मुऱ्हे, दीपक डोंगरे, माजी उपसरपंच अमित मुऱ्हे, मच्छिंद्र डोंगरे, मल्हारी बांदल, नवनाथ बांदल, राजू मुऱ्हे, अजित गायकवाड, रामरत्न गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
कुरुळी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत व सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच कविता गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच डोंगरे वस्ती येथील महिलांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करून सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी ड्रेनेज लाइन काम सुरू केले. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीकाठी असलेल्या स्मानभूमिमध्येही सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून या कामाचाही शुभारंभही सरपंच कविता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.