चिंबळी, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील चिंबळी ग्रामपंचायत व शासकीय निधीतून विविध विकासकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंखे यांनी सांगितले.
चिंबळी गावठाण अंतर्गत मागासवर्गीय वस्तीत बंदिस्त गटार योजना करणे, गावठाण हद्दीतील समाज मदिरांकडे जाणारा रस्ता, अनु. जाती व बौद्ध घटक विकास करणे व परिसर सुधारणा करण, चिंबळी येथील स्मशानभूमी परिसरात शौचालय व स्नानगृह बांधणे, बर्गे वस्ती येथील अंगणवाडी दुरूस्ती करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी वर्ग खोली बांधणे,
माजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणार्या रस्त्यावर पेंव्हिग ब्लॉक बसविणे, चिबंळी गावठाण येथील समाज मंदिर परिसर सुधारणा करणे, बर्गे वस्ती येथील रस्त्याचे काँक्रिटीकाण आदी कामांचे भूमिपूजन सरपंच ज्योती जैद, उपसरपंच राहुल चव्हाण व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनुराग जैद, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य शिवाजी कड, काळूराम बनकर, चेतन बर्गे, गणेश सोनवणे, राजश्री जैद, संगीता बनकर, ज्योती जाधव, शीतल लोखंडे, शर्मिला कड, शोभा कड आदी उपस्थित होते.