पुणे (हडपसर )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य लाभासाठी प्रभु श्रीरामाची आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
हांडेवाडी रोड श्रीराम चौक येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपा मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका विजया वाडकर , एच. व्ही.देसाई हॉस्पिटल मंहमदवाडी , जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष विकास भुजबळ, कार्याध्यक्ष अॅड. अलोक गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते .
यावेळी केंद्र सरकारच्या लाभार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील कोरोना काळात ज्यांनी काम केले अशा पोलीस कर्मचारी, महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी श्री राम प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली .यावेळी गरजूंना विजया वाडकर यांच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष भूषण तुपे ,जनसेवा बँकेचे संचालक रवी तुपे, हडपसर विधानसभा भाजपाचे संघटक सचिव गणेश घुले , महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती कुरणे , महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक संजय घनवट ,आरोग्य निरीक्षक वसंत ससाणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र वायदंडे, अॅड.प्रमोद सातव ,संजय सातव, हनुमंत घुले ,बाळासाहेब घुले, संदीप राऊत, शोभा लगड, अतुल फड ,राहुल दाते ,सुनील भुजबळ ,संजय भुजबळ, संतोष ढवणे ,दिलीप बिडवे ,प्रल्हाद देवघरे , ज्योती झुरुंगे ,मोहिनी वाडकर ,केशव नागरे ,सुबोध ससाणे, डॉ. राहूल ससाणे, डॉ. सुनीता लोडम, डॉ. छाया जाधव, डॉ. सोमनाथ वाडकर ,डॉ. शोभनाथ यादव, डॉ. अविनाश लोडम, माणिक जगताप व परिसरातील नागरिक उपस्थित होते.