आळंदी – राजे ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात 211 जणांनी रक्तदान केले. शंभूराजे सेवाभावी संस्था संचलित शंभूराजे मित्र मंडळ (राजे ग्रुप) तर्फे विनोद पगडे, नितीन सूर्यवंशी, माऊली महाराज सुतार, डॉ. धर्मराज निळे व राजे ग्रुपचे सभासद, आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मंडळाचे हितचिंतक उपस्थित होते.
डॉं. समीर जमादार व पिंपरी-चिंचवड ब्लड बॅंक (पुणे) सर्व टीम मार्फत रक्त संकलित करण्यात आले. विनोद पगडे युवा मंच तर्फे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक गणेशभक्तास एक हेल्मेट भेट देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.