मुंबई – केंद्रीय नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्याना वाढवलेल्या संरक्षणाची माहिती दिली.
संजय राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यानुसार त्यांच्या ताफ्यात सध्या विशेष पोलीस पथकाच्या 6 शस्त्रधारी प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे. त्यात 2 अतिरिक्त जवानांचा समावेश करण्यात आला आहेत.
याशिवाय राऊत यांच्या सुरक्षेत 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही करण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी भाजपा नेते नीतेश राणे आणि नीलेश राणे यांनी संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता.