मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नाही,” असे नारायण राणे म्हणाले. यावर तुमच्याकडे येणार आहेत का? असे विचारण्यात आले असता, “आले तर घेऊन टाकू” असे उत्तर दिले.
नारायण राणेंची एकनाथ शिंदेबद्दल खळबळजनक माहिती; म्हणाले, “लवकरच…”
एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट यावेळी नारायण राणे यांनी केला. राणेंच्या या वक्तव्याचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना मोजण्याचा त्यांचा गुणधर्मच आहे. स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत’