पुणे – सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे कंबरडं मोडलं आहे. एकीकडे कोरोनामुळॆ अनेक लोकांची आर्थिकघडी विस्कटली आहे. त्यातच विना अनुदानित घरगुती एलपीजी सिंलिडरच्या किमतींमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी 25 रुपयांची वाढ केली आहे.
मुंबई, दिल्ली, चेन्नईतील एलपीजी सिंलिडरच्या किमती वाढल्या आहेत. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू होणार आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिंलिडरचे दर आता 859.50 रुपयांवर पोहोचले आहेत.
या अगोदर 1 जुलैला सिंलिडरचे दरात 25.50 रुपयांनी वाढ झाली होती. दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 886 रुपयांना विकण्यात येणार आहे.
तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 859.50 रुपये असणार आहे. लखनौमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 897.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत. एक जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. 1 मार्च 2021 पर्यंत ही किंमत 819 वर पोहचली होती.
एप्रिल महिन्यात त्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव 810 रुपये झाला होता.
दर महिन्याला वाढतोय सिंलिडर
– जून महिन्यात गॅस सिलेंडर – किंमत 809 रुपये
– जुलै महिन्यात गॅस सिलेंडर – किंमत 834 रुपये
– ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडर – 859.50 किंमत 834 रुपये
घरगुती गॅससोबतच 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही 68 रुपयांनी वाढलेत. यापुर्वी 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवले होते.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या . दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.