औंध – देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभाग क्र. ९ मधील ७५ सोसायटींमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला.
भारताने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी १ सुवर्ण पदकासह ईतर पदके जिंकली व देशाची मान उंचावली
नव्या पिढीने विविध खेळात सहभागी झाले पाहिजे व देशाला अनेक सन्मान मिळवून द्यायला हवे, यासाठी ७५ सोसायटी मधील जवळपास २००० हून अधिक लहान मुलांना प्रोत्साहनपर “गोल्ड मेडल” चे वाटप नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यामार्फत करण्यात आले.
यासोबतच त्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले व त्यांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे सोडून अतिशय उत्साहात आजचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला.
लहान मुलांच्या प्रोत्साहनासाठी हाती घेतलेल्या या संकल्पनेला प्रतिसाद दिलेल्या सर्व सोसायट्यांचे व नागरीकांचे बालवडकर यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगिळ, अस्मिता करंदीकर, रिना सोमैया, उज्वला साबळे, राखी श्रीवास्तव, युवा नेते अनिल बाप्पु ससार, अनिल प्रधान, शशिकांत बालवडकर, नितिन रनवरे, किरण तापकिर, गहिनीनाथ कळमकर, प्रविण बालवडकर, योगेश बालवडकर, सागर बालवडकर, राकेश बालवडकर, जिवन बालवडकर, दादा गायकवाड, रोनक गोटे, बाबाराव गित्ते, सुमित कांबळे, वैभव बालवडकर, गणेश पाडाळे, रुषिकेश बालवडकर, वैभव टकले, शुभम बालवडकर, गणेश चौधरी, सचिन मोहिते, विष्णु ठोंबरे, मानिक पांचाळ व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सभासद उपस्थित होते.