मुंबई – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र या निर्बंधाचे राजकीय नेत्याकडूनच उल्लघन होत असल्याचे बऱ्हाच वेळा दिसून आले आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर उपस्थित असलेल्या कार्यक्रमात करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
झारखंडमधील पलामू जिल्ह्यात एका हॉटेलचे उद्धाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान हा कार्यक्रमावेळी करोना नियमांचे उल्लघंन करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मेदिनीनगर मध्ये हा कार्यक्रम पार पडला असून करोना निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची तक्कार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे.