मुंबई : राज कुंद्रा प्रकरणात भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी आता एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. सचिन वाझे आणि राज कुंद्रा यांच्यात काही देवाण-घेवाण झाली होती का? या गोरखधंद्यात वाझे साहेब पण सहभागी आहेत का? अशा शंका त्यांनी उपस्थित केल्या आहेत.
भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी याविषयीचं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ४ फेब्रुवारी २०२१मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आलं होतं. मुंबईतल्या मड भागात ग्रीनपार्क या बंगल्यात पॉर्न फिल्मचं चित्रीकरण होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला होता. त्यावेळी गुन्हे शाखेत सचिन वाझे हे वसुलीबाज अधिकारी होते.
पहली बार मामला 4 फरवरी 2021 को आया। मुंबई मढ में ग्रीनपार्क बगलो पर #पोर्नफिल्म की शूटिंग होने की सूचना पर #क्राइमब्रांच ने रेड किया।
उस वक़्त क्राइम ब्रांच में #सचिनवाज़े प्रभावशाली #वसूलीबाज अधिकारी था।
9 लोगोको फरवरी में गिरफ्तार किया गया था। 10 वा #राजकुंद्रा है जिसे
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) July 31, 2021
तेव्हा ९ लोकांना अटक करण्यात आली होती आणि १० वा होता राज कुंद्रा. पण त्याला अटक करायला ५ महिने १५ दिवस का लागले? त्याला कोण वाचवत आहे? वाझे आणि राज कुंद्रा या दोघांच्यात काही बोलणं, भेटणं किंवा देवाणघेवाण झाली आहे का? या गोरखधंद्यात वाझेचे साहेब पण सहभागी होते का? कोणाच्याही आशिर्वादाशिवाय कुंद्रा ५ महिने १५ दिवस अटकेपासून कसा काय वाचला?
या पूर्वीही राम कदम यांनी राज कुंद्रावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते. राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले असल्याचाही राम कदम यांनी राज कुंद्रावर आरोप केला होता.रमान्य आहे. या खेळात बक्षीसाची रक्कम दिली जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. देशभरातील लोकांना लुटलं गेलं आहे. २५०० ते ३००० कोटींचा घोटाळा विआन इंडस्ट्रीने केला आहे.