मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज राज कुंद्राची न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यास आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
View this post on Instagram
अशातच आता या प्रकरणात राज कुंद्रा यांना FEMA अंतर्गत नोटीस समन्स बजावले जाऊ शकते. या प्रकरणात, कंपनीच्या संचालकांची देखील चौकशी होऊ शकते. शिल्पा शेट्टीची भूमिका पाहिल्यास तिचीही चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.
राज कुंद्रा यांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केल्या संदर्भात पुरावा मिळाल्यानंतर आता ईडी या प्रकरणाची दखल घेणार आहे. तपास एजन्सी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची एफआयआर मागवेल आणि लवकरच गुन्हा नोंदवेल.
दरम्यान, राज कुंद्रा याने केलेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी ईडी FEMA च्या नियमांतर्गत होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच सोडले मौन; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…
शिल्पा शेट्टीचाही porn flims प्रकरणात सहभाग आहे का? काईम ब्रांचने केली सहा तास कसून चौकशी