“पुण्यात दुकानांची वेळ वाढवण्यासाठी मी सकारात्मक पण…”; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

पुणे : राज्यात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. पुण्यातही रुग्णसंख्येत घट होत असून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळेच पुण्यातील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून सातत्याने होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मोठे वक्तव्य केले आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, पुण्यात सोमवार पासून दुकानांची वेळ संध्याकाळी 7 वाढवून मिळावी, अशी मागणी आहे. मी स्वत: सकारात्मक आहे पण अंतिम निर्णय सोमवारीच मुंबईतून जाहीर करणार. तिसरी लाट येऊच नये, पण तरीही प्रशासनाची तयारी सज्ज ठेवणार.

दुकानांची वेळ वाढवून देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत सोमवारी जाहीर होणार असल्याचे  अजित पवारांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

पुण्यात आज मोबाइल ऑक्सिजन जनरेटर व्हॅनचे उद्घाटन केले. या व्हॅन पुणे, पिंपरी चिंचवड मनपासाठी विकत घेण्याचा आमचा विचार आहे. आपत्तीजनक परिस्थितीत ही व्हॅन ऑक्सिजन पुरवठ्यासाठी खूप उपयोगी पडू शकते. अग्निशमन दलाप्रमाणे ही मोबाइल ऑक्सिजन व्हॅन काम करेन.. पेशंट्सचा जीव वाचवण्यासाठी या मोबाइल ऑक्सिजन जनरेटरचा फायदा होईल असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.