वेगवेगळे मेकअप लूक करणे अनेकांना आवडते. कारण मेकअपनुसार चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. वेगवेगळ्या मेकअपमुळे तुम्ही चेहऱ्याचाही लूक बदलू शकता. तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसण्यासाठी एक सुंदर नेक पीस आणि इअर पीस कॅरी करा.
अगदी मोजकेच पण सुंदर दागिन्यांमध्ये तुम्ही आणखी चमकत राहाल. एमराल्ड ग्रीन रंगाच्या दागिन्यांमध्ये तर तुम्ही खूपच सुंदर दिसाल. ज्वेलरीच्या लूकशी आपला मेकअप जुळण्यासाठी डोळ्यावर ग्रीन कलरच्या आय शेडो लावा. याशिवाय आपला लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड लिपस्टिक परिधान करा.
तसेच आपले केस मोकळे ठेवा, ज्यामुळे तुमचा लूक आणखी उजळून निघेल.
या लूक सोबतच तुम्ही केस पाठीमागे सोडू शकता. ज्वेलरी कमी करू शकता. न्यूड लिपस्टिकऐवजी हलकी पिंक लिपस्टिकही वापरू शकता. ब्लॅक ड्रेस परिधान केल्यास तुमचा मेकअप आणखी उठून दिसणार.
ब्लॅक ड्रेसवर हाय हिल्स वापरल्यास तुम्ही उंच दिसतात आणि तुमच्या मेकअपचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो. त्यामुळे तरुणींनी हा मेकअप ट्राय करण्यास हरकत नाही.