वालचंद संचेती यांचे पंतप्रधानांना पत्र
पुणे – केंद्र सरकारने डाळी साठा मर्यादा संदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (महाराष्ट्र) चे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.
करोना काळात व्यापारी वर्गाने जीवाची पर्वा न करता अन्नधान्य साठा सुरळीत ठेवला आहे. करोना काळातही मार्केटमध्ये कोणत्याही डाळीच्या भावात वाढ झालेली नाही. तरीही केंद्र सरकारने डाळीसाठी साठा मर्याद्याचा अध्यादेश काढला आहे.
या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यात अडचण येत आहे. व्यापाऱ्यांना वेळोवेळी पोर्टलवर साठ्याची माहिती पाठविणे आणि साठा मर्यादा लावण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग हैराण होत आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली असल्याचेही संचेती यांनी सांगितले.