नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत कलह वारंवार समोर येत आहे. अनेक राज्यांमधील नेत्यांमध्ये असलेले मतभेद समोर आल्यानंतर आता उत्तर प्रदेशातही अशीच घटना घडली आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी यांच्याविषयी भाजपच्याच आमदाराने वादग्रस्त ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.
मेनका गांधी या ‘घटीया महिला’ आहेत अशा शब्दात आमदार अजय बिष्णोई यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आमदाराने स्वपक्षीय खासदारावर आणि तेही महिला खासदारावर अशा शब्दांत टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मनेका गांधी यांनी जबरलपूरमधल्या एका पशूंच्या डॉक्टरशी बोलताना काही विधाने केली होती. त्यामुळे बिष्णोई यांचा पार चढला.
आमदार विष्णोई म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच श्रीमती मनेका गांधी यांनी पशुचिकित्सक डॉ. विकाश शर्मा यांच्याशी ज्या भाषेत संवाद साधला, त्यावरून व्हेटरनरी महाविद्यालय ‘घटीया’ सिद्ध होत नाही. मात्र मनेका गांधी निश्चितच घटीया महिला आहे. मला लाज वाटते की त्या माझ्या पक्षाच्या खासदार आहेत. मात्र त्या नेत्या नाहीत, असंही विष्णोई यांनी ट्विटमध्ये म्हटलं.