पुणे – आयटी कंपनीतून घरी निघालेल्या महिलेचा विनयभंग करून पसार झालेल्या एकास मुंढवा पोलिसांनी अटक केली. यश दीपक डाडर (वय २६, रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आयटी कंपनीत कामाला आहे. दोन महिन्यांपूर्वी कामावरून घरी जात असलेल्या आयटी कंपनीतील महिलेचा विनयभंग करून डाडर पसार झाला होता.
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. डाडर याने गुन्हा केल्याची माहिती पोलीस कर्मचारी दिनेश राणे आणि महेश पाठक यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी डाडरला सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले, गुन्हे शाखेतील निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन, अविनाश मराठे, दत्ता विभुते, नाना भार्दुेंगे, भारत उकिरडे, नीलेश पालवे, स्वप्नाली आमले आदींनी ही कारवाई केली.